Ad will apear here
Next
शपथ तुला आहे
परदेसी परदेसी जाना नही..
परदेसीयोंसे ना अखियाँ मिलाना...
किती फिल्मी वाटतंय ना सगळं...
ऐसा तो सिर्फ कहाँनीयों में होता है !
तिच्या बाबतीत झालं खरं.
गोष्ट तशी जुनी आहे.
कोकणातली.
कोकण रेल्वेचं काम चालू होतं तेव्हा.
सतराशे साठ ट्रक यायचे.
लालेलाल खडी माती ओकायचे.
खडीमातीचे भलेमोठे डोंगर ऊभे रहायचे.
मुंगीच्या पावलांनी रोलर यायचा.
गोलगोबर्या चाकांनी डोंगर दाबून ट्रॅक तयार करायचा..
लांबचलांब सरळसोट चकचकीत,
रेल्वेचे रूळ टाकले जायचे.
ईन्जिनाला घाई झालेली.
पुढं पुढं जाण्याची...
पन्नास साठ मजूर, त्यांचे साहेब...
ईथं आडगावात येऊन राहिलेले.
सगळ्यांची पोशिंदा.
ते झोपडी कॅन्टीन.
झोपडीच होती ती खरी.
ती आणि तिचा म्हातारा बाप.
दोघं मिळून हे कॅन्टीन चालवायचे.
चहा,वडापाव , ऊसळपाव, भजीपाव
आणि अगदीच कुणाला हवं असेल तर..
घरगुती जेवण.
ती तशी काळीसावळी.
दहावी झालेली.
तजेलदार कांती.
विलक्षण बोलके काळेभोर डोळे.
नाक टोचलेलं.
नाकात छोटीशी चमकी.
कानात छोटेसे डूल.
घनदाट काळेभोर केस.
ओळखीचं हसू.
काहीतरी जादू होती तिच्यात.
जादू चल गई.
तो ईन्जिनियर साब.
तिथला सगळ्यात मोठा साब.
गोर्रा पान.
ऊंचच ऊंच.
दिल्लीवाला.
कमावलेलं शरीर.
झोपडी कॅन्टीनमधे यायचा तेव्हा तांबड्या मातीने न्हालेला.
डोक्यावर पिवळं हेल्मेट.
तिच्या हातचा चहा.
अमृततुल्य.
'साहेबाकडे खास लक्ष दे..'
तिच्या बापाने सांगितलेलं.
काळजी नको.
साहेबाचंच खास लक्ष असायचं तिच्याकडे.
गरमागरम वडापाव.
घरगुती जेवण.
साहेबाची आवडनिवड जपणारं.
त्याला वाढायला म्हणून ती शेजारी ऊभी असायची..
सवय झाली त्याला तिच्या असण्याची.
तुझ्यावाचून करमेना.
दिल है की मानता नही.
रूळावरून पाय घसरून, गाडी पडावी तसं झालेलं..
तेरे बिन क्या जिना !
साहेब प्रेमातच पडला तिच्या..
डायरेक्ट तिच्या बापाशी बोलला.
सीधी बात नो बकवास.
मागणीच घातली तिला.
तिच्या बापाने दहा पावसाळे जास्त बघितलेत.
" साहेब, घाई नका करू.
घरी ईचारून घेवा."
'घरी माझी फक्त आईच असते.
मेरी पसंद, ऊसकी पसंद !'
तो हवेत...
तिची हालत तर आज मै ऊपर,
आसमाँ नीचे स्टाईल झालेली.
'या रविवारी दिल्लीला जाईन.
आठ दिवसांची सुट्टी घेऊन.
येताना आईला घेऊनच येईन.
यूँ गया और यूँ आया !'
हातात हात घेऊन त्यानं तिला प्राॅमिस केलं.
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे...
तो गेला तो गेलाच.
तिकडचाच झाला.
ती वाट बघतेय रोज...
कतरा कतरा...
त्याची आठवण.
ना कोई खत, ना कोई चिठ्ठी.
तेव्हा कुठे हो मोबाईल ?
या आडगावात साधा लॅन्डलाईन नव्हता..
रेल्वेला घाई झालेली..
ती आपली रूळांना साथीला घेऊन पुढे पुढे पळतेय.
नवीन स्टेशनचं काम जोरात सुरू.
त्याची आठवण काढली लोकांनी.
तो गेला आणि नवीन साहेब आला.
कुणावाचून कुणाचं काहीही अडत नाही.
तिचं अडतंय..
डोळ्यात आठवणींचा समुद्र थोपवून धरलाय तिनं.
तिचं मन सांगतय.
तो तसा नाहीये..
दिल्या वचनाला जागणारा आहे.
तो याद्दाश खो जानेवाला दुष्यंत आहे की काय ?
आमची शकुंतला बिचारी रोज,
नवीन ऊभारलेल्या स्टेशनवर जायची.
तिथंच नवीन बस स्टॅन्ड.
तालुक्याहून आलेली रिकामी एस्टी डोळे भरून बघायची.
काय झालं त्याचं..
वो आयेगा !
जरूर आयेगा !
मन में है विश्वास.
पुरा है विश्वास.
"दिल्लीवाले असेच.
कुणाचाही भरोसा नाही.."
तिच्या मैत्रिणी टोचून टोचून बोलल्या.
सहा महिने वाट बघितली.
खूप झालं....
तिच्या बापाचा पेशन्स संपला.
ऊद्या गावापर्यंत रेल्वे यायचीय.
नवीन स्टेशनचं ऊद्घाटन.
दुपारी तिच रेल्वे मुंबैला वापस जाईल.
ती आणि तिचा बाप.
दुपारच्या गाडीनं मुंबैला जाणार.
पोरीच्या मावशीनं पोरगा बघितलाय.
दोन दिवसांनी साखरपुडा.
कुऽऽक करून रेल्वे आली.
स्टेशनला फुलांच्या मुंडावळ्या.
बॅन्डबाजा.
मंत्रीसाहेब आले आणि गेले..
दमलेली गाडी जरासी विसावली.
दुपारी पुन्हा वापस मुंबैला जायचंय गाडीला.
तिची झोपडी पॅकअपच्या तयारीत..
तिचे डोळे अजूनही शून्यात हरवलेले.
त्याची एन्डलेस वाट बघतायेत.
मगाचचाच बॅन्ड तिच्या दारात.
दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे वाजतंय.
शगुन घेऊन त्याची आई दारात ऊभी.
तिचा बाप आनंदाने वेडा.
आणि तीही..
"काही विचारू नका..
मुंडा दिल्लीला पोचला.
मी कशाला नाही म्हणतेय.
दुल्हन के वास्ते मंगलसूत्र खरीदने गये थे !
गाडी स्लिप...
तो कोमात आणि मी प्लास्टरमधे !"
सहा महिने हाॅस्पीटल हाॅस्पीटल खेळ होती दोघं.
अरे बापरे !
भगवान का लाख लाख शुकर !
चालायचंच..
कर भला तो हो भला.
मी म्हणलं नव्हतं?
तो वचनाला जागणार.
शेवट गोड झाला..
आणखी काय हवं ?
पंचवीस वर्ष झालीयेत या लग्नाला.
नांदा सौख्यभरे !
सहज मनात आलं.
'तो तिच्याकडे बॅन्ड घेऊन गेला
तो दिवस कुठला होता ?
तो प्राॅमीस डे होता.
आईशप्पथ..

.....कौस्तुभ केळकर नगरवाला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSJDY
Similar Posts
शपथ तुला आहे परदेसी परदेसी जाना नही.. परदेसीयोंसे ना अखियाँ मिलाना... किती फिल्मी वाटतंय ना सगळं...
शपथ तुला आहे परदेसी परदेसी जाना नही.. परदेसीयोंसे ना अखियाँ मिलाना... किती फिल्मी वाटतंय ना सगळं...
शपथ तुला आहे परदेसी परदेसी जाना नही.. परदेसीयोंसे ना अखियाँ मिलाना... किती फिल्मी वाटतंय ना सगळं... ऐसा तो सिर्फ कहाँनीयों में होता है !
लाखाची गोष्ट आजची थंड सकाळ. ऊदास. बंडोपतांची झोप ऊडालेली. घड्याळाने सहाचे ठोके दिले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language